गेल्या दीड महिन्यापासून पावसाने राज्यभर विश्रांती घेतली होती यानंतर गोकुळाष्टमी झाल्यापासून अनेक भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान मागच्या दोन दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. इतकच नाही तर गोदावरी नदीलाही पूर आल्याने तेथील नागरिकांची दाणादाण उडाली आहे. (Godavari River)
G-20 summit । इंडिया नाही भारतच! G20 परिषदेत नरेंद्र मोदींच्या समोरील फलकावरून चर्चा
पुढील चार दिवस कोसळणार पाऊस
या पुरामुळे नदीकाठच्या परिसरातील मंदिरे, घरे, शेत पाण्याखाली गेली आहेत . त्यामुळे नागरिकांची मोठी दाणादाण उडाली आहे. मात्र या पावसामुळे तेथील लोकांची आता वर्षभर पाण्याची चिंता मिताली आहे. दरम्यान पुढच्या चार दिवस जिल्ह्यात मध्यम पाऊस कोसळण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (Havaman Andaj)
नाशिकमध्ये आज सकाळपासूनच पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातील पहिला पूर आला आहे. रामकुंड परिसरातील छोटी छोटी मंदिरे पाण्याखाली गेली असल्याची माहिती मिळत आहे. तब्बल तीन महिन्यांनी गोदावरी नदी पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागली असल्याचं त्या ठिकाणच्या लोकांच म्हणणं आहे.
गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये पाणी सोडलेले आहे आणि त्याचबरोबर संततधार पाऊस देखील सुरू आहे. या दोन्ही पाण्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. सकाळी ८:२० वाजेपासून दुपारी २:२० वाजेपर्यंत नाशिक शहरांमध्ये जवळपास 55 मीमी पावसाची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे.