Maratha Reservation । मागच्या दहा ते बारा दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला चर्चेत आहे. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्याव या मागणीसाठी जालन्यातील मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. ते उपोषणाला बसलेले जवळपास बारा दिवस झाले आहेत तरी अजून देखील यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. काल जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाची सरकार सोबत बैठक देखील झाली. त्यानंतर सरकारच्या वतीने अर्जुन खोतकर एक बंद लिफाफा घेऊन येणार आहेत आणि हा लिफाफा जरांगे पाटील यांना देण्यात येईल.
मात्र आता मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीमुळे ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. ओबीसी समाजातील अनेक नेते आक्रमक होत चालले आहेत. यामध्येच आता माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांनी राज्य सरकारला एक इशारा दिला आहे.
Maratha Reservation । मराठा आरक्षणाचा तिसरा मुद्दा ठरणार डोकेदुखी? जाणून घ्या नेमकं प्रकरण
याबाबत बोलताना सुनील केदार म्हणाले, कुणबी समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या विषयांमध्ये जर कोणी ढवळाढवळ केली तर ती मान्य करणार नाही. कोणाचा किती जरी प्रयत्न असला तरी हाणून पाडू. त्यामुळे कुणबी समाजाच्या अस्मितेला हात लावण्याचा प्रयत्न करणार नाही जर असं कोणी केलं तर त्याला मोठे भयंकर उत्तर देऊ असं सुनील केदार म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.
Kishori Pednekar । मोठी बातमी! किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ, दाखल झाला गुन्हा