Mahakumbh 2025 । सर्वात मोठी बातमी! महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, 17 जणांचा मृत्यू, शाही स्नान रद्द

Mahakumbh 2025

Mahakumbh 2025 । उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. 13 जानेवारीपासून सुरू झालेल्या या महाकुंभमेळ्यात कोट्यावधी भाविकांनी हजेरी लावली होती. मात्र, आता अमृत स्नानासाठी चंद्रवाड्याजवळ झालेल्या अत्यधिक गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आणि त्यात 17 जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात जखमी झालेले 50 हून अधिक भाविक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

Hiradgaon News । हिरडगाव ग्रामपंचायतचा कर दिल्याबद्दल चेअरमन बोत्रे पाटील यांचा येथोचीत सन्मान!

घटना मध्यरात्री 1 वाजता घडली, जेव्हा मोठ्या संख्येने भाविक त्रिवेणी संगमावर स्नानासाठी आले होते. चेंगराचेंगरीच्या कारणामुळे प्रशासनाने शाही स्नान थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आखाडा परिषदेला स्नान थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घटनास्थळी तातडीने मदत कार्य सुरु करण्यात आले आहे आणि जखमींवर उपचार सुरु आहेत.

Baba Siddiqui । सर्वात मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात भाजपच्या नेत्याचे नाव समोर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा आढावा घेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधला आणि तात्काळ मदत करण्याचे निर्देश दिले. पंतप्रधान मोदींनी याप्रकरणी संपूर्ण घटनाक्रमाची माहिती घेतली असून, राज्य सरकारला यासाठी सर्वतोपरी मदतीचे निर्देश दिले आहेत.

Pune Accident News । पुण्यात हिंजवडीत भीषण अपघात, डंपरखाली दुचाकी आल्याने दोन महिलांचा जागीच मृत्यू

महाकुंभमेळ्यात संपूर्ण जागतिक पातळीवर श्रद्धावंत येतात आणि यंदा त्रिवेणी योगाच्या विशेष संयोगामुळे अधिक भाविकांची उपस्थिती अपेक्षित होती. महाकुंभाच्या प्रशासनाने 1 हजाराहून अधिक वैद्यकीय कर्मचारी आणि 300 तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णालयात तैनात केले होते, तरीही या घटनेत मोठ्या प्रमाणात जखमी झालेल्या भाविकांची संख्या वाढली आहे.

Bhandara News । भंडाऱ्यात स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट, 14 कामगार अडकल्याची भीती, एकाचा मृत्यू

Spread the love