Mahakumbh Stampede । महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाविकांना महत्त्वाचे आवाहन

Mahakumbh Stampede

Mahakumbh Stampede । उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात आज मौनी अमावस्या आणि शाही स्नानाचा महत्त्वाचा दिवस आहे. मात्र, आज पहाटे या शाही स्नानासाठी त्रिवेणी संगमाच्या दिशेने जात असलेल्या रस्त्यावर मोठी चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

Baba Siddiqui । सर्वात मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात भाजपच्या नेत्याचे नाव समोर

घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाविकांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, “संगम नोजवर जाऊ नका आणि गंगा किनाऱ्यावर असलेल्या अन्य घाटांवर स्नान करा.” त्यांनी भाविकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. यासोबतच त्यांनी अफवांपासून दूर राहण्याचेही सांगितले.

Mahakumbh 2025 । सर्वात मोठी बातमी! महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, 17 जणांचा मृत्यू, शाही स्नान रद्द

महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी घडल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधला आणि परिस्थितीवर लक्ष ठेवले. याशिवाय, अखिल भारतीय अखाडा परिषदेतून मौनी अमावस्येचे अमृत स्नान सध्या रद्द केले असल्याचे सांगितले आहे. या घटनेनंतर प्रशासनाने मदत कार्य सुरू केले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Eknath Shinde । एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नव्हते, बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने राजकारणात उडाली मोठी खळबळ

Spread the love