Hiradgaon News । हिरडगाव ग्रामपंचायतचा कर दिल्याबद्दल चेअरमन बोत्रे पाटील यांचा येथोचीत सन्मान!

Hiradgaon news

Hiradgaon News । श्रीगोंदा : तालुक्यातील हिरडगाव येथे सुरू असलेल्या गौरी शुगरचे सर्वेसर्वा मा बाबुराव बोत्रे पाटील यांचा सत्कार करणेत आला निमीत्त होत हिरडगाव ग्रामपंचायतीचा कर वसुली बाबत हिरडगाव हद्यीत सन २०१०/११ या हंगामात साईकृपा साखर कारखाना सुरु झाला २०११/१२ साली ग्रामपंचायत पंच कमेटी व कारखाना व्यावस्थापनाने बसून ठोक अंशदानात रुपये ७०००००/- ( सात लाख) कर आकारणी केली पहिल्या वर्षी वसुल झाला परंतू नंतर कारखाना व्यावस्थापनाच्या अडचनीमुळे थकबाकी वाढली सदर बाब न्यायप्रविष्ठ आहे

तदनंतर गेल्या गळीत हंगामा पासून ओंकार ग्रुप कारखाना चालवत आहे त्यांनी ग्रामपंचायत कर भरणेस तत्वता मान्यता देवून सन २०२३/२४ व २०२४/२५ या हंगामाचा म्हणजेच दोन वर्षाचा कर एकरकमी १४०००००/- ( चौदा लाख ) रुपये भरणा केला सदर कराची पावती विद्यमान सरपंच सौ विद्याताई बनकर ऊप सरपंच श्री अमोल दरेकर सदस्य श्री चिमाजी दरेकर सौ सुनिता दरेकर सौ दिपाली दरेकर सौ जयश्री ससाणे यांनी देवून एकरकमी वसुल दिलेबद्दल
मा श्री बोत्रे पाटील यांचा सत्कार केला! मा श्री बोत्रे पाटील यांनी गेल्या वर्षी नागनाथ मंदीर देवस्थानाला एकलाख रुपये व जिप प्रा शाळेला एकलाख रुपये देणगी दिली त्या अनुसंघाने गावचे वतीने सत्कार केला व ग्रामस्थांनी आभार मानले

Spread the love