Kailas Patil । मोठी बातमी! ठाकरे गटाच्या आमदाराला प्रचारसभेत आली भोवळ

Kailas Patil

Kailas Patil । महाविकास आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडी जोरात तयारी करताना दिसत आहे. राजकीय वर्तुळातून सध्या एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रचारसभेदरम्यानच ठाकरे गटाच्या आमदाराला भोवळ आल्याची घटना घडली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Latest marathi news)

Sharad Pawar । शरद पवारांचा नवा डाव, अजित पवार गटाच्या बड्या नेत्याची घेतली भेट

खासदार ओमराजे निंबाळकर (Omraj Nimbalkar) यांच्या प्रचारसभेत ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेलं आहे. सध्या कैलास पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांना हा त्रास उष्माघातामुळे झाला आहे. धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांची सभा सुरु होती.

Baramati Loksabha । बारामतीच्या राजकारणात नवा ट्विस्ट, सुनंदा पवारांनी घेतला उमेदवारी अर्ज

त्यावेळी कैलास पाटील यांना चक्कर आली. उष्माघाताचा कैलास पाटील यांना फटका बसला आहे. दरम्यान, घटनेचं गांभीर्य ओळखून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना एका गाडीतून रुग्णालयात दाखल केलं. सध्या कैलास पाटील यांना रुग्णालयात नेत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Nashik News । नाशिक हादरलं! 16 वर्षाच्या मुलासोबत घडलं भयानक

Spread the love