Sharad Pawar । शरद पवारांचा नवा डाव, अजित पवार गटाच्या बड्या नेत्याची घेतली भेट

Sharad Pawar

Sharad Pawar । बारामती : बारामती मतदारसंघात यंदा अटीतटीची लढत पार पडणार आहे. कारण पहिल्यांदाच या मतदासंघात नणंद विरुद्ध भावजय असा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार (Supriya Sule Vs Sunetra Pawar) यांच्या लढतीत कोणाचा विजय होणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अशातच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.

Baramati Loksabha । बारामतीच्या राजकारणात नवा ट्विस्ट, सुनंदा पवारांनी घेतला उमेदवारी अर्ज

आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माळेगाव साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे (Balasaheb Taware) यांची भेट घेतली. दरम्यान, तावरे हे अजित पवार गटाचे नेते असून या भेटीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मोठा धक्का बसला आहे. इतकेच नाही तर माळेगावात राजकिय दृष्ट्या महत्व असणाऱ्या बुरूंगले, सस्ते कुटुंबियांना देखील शरद पवार यांनी भेट दिली आहे.

Nashik News । नाशिक हादरलं! 16 वर्षाच्या मुलासोबत घडलं भयानक

“तुम्ही माझ्या आणि सुप्रिया सुळे यांच्या बरोबर आहात असे मी समजतो,” अशा मोजक्या शब्दात शरद पवार यांनी संबंधित कुटुंबियांना आपलेसे करण्याचा यावेळी प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे, बाळासाहेब तावरे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “पवारसाहेबांची कोणतीही राजकिय भेट नव्हती. पवारसाहेबांचे पुर्वीपासून माझ्या कुटुंबियांशी चांगले संबध राहिलेले आहे.”

Salman Khan । सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपींची पोलिसांकडून चौकशी, बिहारशी संबंध; धक्कादायक माहिती समोर

Spread the love