Baramati Loksabha । बारामतीच्या राजकारणात नवा ट्विस्ट, सुनंदा पवारांनी घेतला उमेदवारी अर्ज

Baramati Loksabha

Baramati Loksabha । बारामती मतदारसंघात यंदा अटीतटीची लढत पार पडणार आहे. कारण पहिल्यांदाच या मतदासंघात (Baramati Loksabha Election) नणंद विरुद्ध भावजय असा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार (Supriya Sule Vs Sunetra Pawar) यांच्या लढतीत कोणाचा विजय होणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अशातच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.

Nashik News । नाशिक हादरलं! 16 वर्षाच्या मुलासोबत घडलं भयानक

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यानंतर शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले लक्ष्मण खाबिया यांनी सुनंदा पवार (Sunanda Pawar) यांच्यासाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. सुनंदा पवार या शरद गटाचे नेते रोहित पवार यांच्या आई आहेत. सुनंदा पवार यांचा भीमथडी जत्रा आणि बारामती अॅग्रोच्या माध्यमातून चांगला जनसंपर्क आहे. लोकसभेचा अर्ज भरल्याने सुनंदा पवार या चर्चेत आल्या आहेत.

Salman Khan । सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपींची पोलिसांकडून चौकशी, बिहारशी संबंध; धक्कादायक माहिती समोर

महाविकास आघाडीच्या बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे या अधिकृत उमेदवार आहेत. समजा सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज कोणत्या कारणामुळे बाद झाला किंवा अर्जात काही त्रुटी आढळल्या तर पर्यायी अर्ज म्हणून सुनंदा पवार यांचा अर्ज भरला आहे. त्यामुळे आता रोहित पवार यांच्या आईदेखील लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या आहेत.

Rahul Gandhi । महिला नेत्याचा धक्कादायक खुलासा, म्हणाल्या; “माझं राहुल गांधींसोबत लग्न….”

Spread the love