Eknath Shinde । एकनाथ शिंदेंसाठी सर्वात धक्कादायक बाब! स्वतःच्याच गटाचे आमदार गेले विरोधात; नेमकं प्रकरण काय?

Eknath Shinde

Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांनी शिवसेने सोबत बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत काही आमदार देखील गेले. यामध्ये आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांचा देखील समावेश आहे. दरम्यान याच आमदाराने हिंगोलीत (Hingoli) राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संभाजीनगर मध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये हिंगोलीच्या कयाधू नदीतील पाणी ईसापुर धरणमार्गे नांदेडला पळविण्याचा निर्णय झाल्याने संतोष बांगर हे विरोधकांसह राज्य सरकारवर (State Goverment) संतापले आहेत.

Viral Video । कार पार्किंगमध्ये सहा तरुणींची तुफान हाणामारी; व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

यामधील सर्वात विशेष बाब म्हणजे संतोष बांगर हे शिंदे गटातीलच आमदार आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सोडवताना मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच गटातील आमदारांशी संघर्ष करावा लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. सत्तेत असलेले लोकप्रतिनिधी विरोध करत असल्याने हिंगोलीच्या पाणी प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांमध्ये ठिणगी पडण्याची चिन्हे आता दिसत आहेत.

Dilip Walse Patil । “ही भेट पूर्वनियोजित होती त्यामुळे…”, शरद पवारांना भेटताच दिलीप वळसे पाटलांनी दिली प्रतिक्रिया

या आधी देखील सरकारच्या वतीने हिंगोली मधील कळमनुरी तालुक्यात सापळी धरणाला मान्यता देऊन हिंगोलीचे पाणी पळवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र यावेळी आपण स्वतः सापळी धरण रद्द करण्यासाठी प्रयत्न केले होते त्यामुळे आता देखील सरकारचा पाणी पळवण्याचा निर्णय पूर्ण होऊ देणार नसल्याचे सांगत राज्य सरकारच्या या निर्णयाला आमदार बांगर यांनी कडाडून विरोध केला आहे.

Sharad Pawar । राजकीय घडामोडींना वेग! अजित पवार गटातील मंत्री शरद पवारांच्या भेटीला

Spread the love