Sangli Loksabha Election । सांगली : संपूर्ण राज्यात लोकसभेच्या निवडणुकांची (Loksabha Election) जोरात तयारी सुरु आहे. सर्व राजकीय पक्ष ठिकठिकाणी प्रचारसभा घेताना दिसत आहेत. अशातच आता लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला सर्वात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसने (Congress) महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर बहिष्कार टाकला आहे.
Loksabha Election 2024 । शरद पवारांची मोठी खेळी! बडा नेता करणार शरद पवार गटात प्रवेश
ठाकरे गटाने महाविकास आघाडीच्या मेळाव्याचे आयोजन केलं असून सांगलीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात चंद्राहार पाटील (Chandrahar Patil) यांच्या प्रचारार्थ मेळावा आयोजित केला आहे. पण काँग्रेसने त्यावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच सांगलीत काँग्रेस नेते विशाल पाटील ((Vishal Patil) नाराज असून ते अपक्ष अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Lok sabha Election । सर्वात मोठी बातमी! ..तर प्रायव्हेट कंपन्यांवर होणार कारवाई
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून काँग्रेस जिल्हाध्यक्ष विश्वजीत कदम यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. पण त्यांनी मेळाव्याला न जाण्याची भूमिका जाहीर केली आहे. सांगलीतून विशाल पाटील यांना उमेदवारीची अपेक्षा होती. पण चंद्राहार पाटील यांना सांगली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
Maharashtra politics । निवडणुकीपूर्वी काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का! बड्या नेत्याचा पक्षाला रामराम