Pune Crime । एकतर्फी प्रेम आलं अंगलट! अल्पवयीन मुलीवर कोयत्याने हल्ला, धक्कादायक व्हिडिओ समोर

Pune Crime

Pune Crime । राज्यात एकतर्फी प्रेमातून (One sided love) अनेक गुन्हे घडत आहेत. या घटनांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. कायदे कडक केले तरीही या घटना कमी होत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना (Crime) आळा घालणे हे प्रशासनासमोरचे मोठे आव्हान बनले आहे. (Latest marathi news)

Supriya Sule । सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात येणार मोठा भूकंप

अशीच एक धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील सुभाषनगरमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणाने ११ वी शिकत असणाऱ्या मुलीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकांनी आरडा-ओरडा केल्यानंतर दोन्ही तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) समोर आले आहे. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Devendra Fadnavis । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

मुलगी बोलत नसल्याच्या रागातून हा हल्ला झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आरोपीने मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण नागरिकांनी केलेल्या आरडा-ओरडामुळे त्यांचा हा प्रयत्न फसला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातारवण पसरले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

Eknath Shinde । निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ

Spread the love