Supriya Sule । सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात येणार मोठा भूकंप

Supriya Sule

Supriya Sule । पवारांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती मतदारसंघात यंदा नणंद विरुद्ध भावजय (Supriya Sule vs Sunetra Pawar) अशी लढत पाहायला मिळणार आहे. अटीतटीच्या सामन्यात बारामतीकर कोणाला निवडून देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जरी ही लढत नणंद विरुद्ध भावजय अशी असली तरी खरी लढाई शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच आहे. (Latest marathi news)

Devendra Fadnavis । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

अशातच आता खासदार सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमुळे (Supriya Sule Whatsapp Status) राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅपला खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांचे दोन फोटो शेअर केले आहेत. त्यातील पहिल्या फोटोत शरद पवारांनी आपले दोन्ही हात वरती केले आहेत. तर दुसऱ्या फोटोत शरद पवारांनी कॉलर वर उडवली आहे.

Eknath Shinde । निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ

सोशल मीडियावर सध्या हा फोटो खूप व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंनी या फोटोला ‘कितीबी येऊदे त्यांना एकटा बास’, असे कॅप्शन दिलं आहे. या फोटोची राजकीय वर्तुळात खूप चर्चा होत असून सुप्रिया सुळेंनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना डिवचले आहे. त्याला आता विरोधक कशाप्रकारे उत्तर देते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Satara Lok Sabha Election । साताऱ्याच्या राजकारणात मोठी खळबळ! उदयनराजेंचा पत्ता होणार कट?

Spread the love