Eknath Shinde । निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ

Eknath Shinde

Eknath Shinde । सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) धामधूम आपल्याला पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अनेक नेते पक्षांतर देखील करत आहेत. या नेत्यांच्या पक्षांतराचा फटका अनेक पक्षांना बसण्याची शक्यता आहे. दरम्यान आता शिवसेना शिंदे गटाला देखील माढा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. (Politics News )

Car Accident News । भीषण अपघात! शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीला पोलिसांच्या गाडीची जोरात धडक

माढा लोकसभा संपर्कप्रमुख संजय कोकाटे (Sanjay Kokate) यांनी शिवसेना शिंदे गटाला रामराम ठोकला आहे. संजय कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Ravindra Dhangekar । माझी पीएचडी… भाजपने शिक्षणावरून केलेल्या टीकेचा धंगेकरांनी घेतला खरपूस समाचार

संजय कोकाटे हे शुक्रवारी शेकडो समर्थकांसह शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई या ठिकाणी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांच्या विरोधात संजय कोकाटे यांनी शड्डू ठोकला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच संजय कोकाटे यांनी शिंदे गटाची साथ सोडल्याने एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे.

Nilesh Lanke । “वेळ आली की मी सर्व सांगणार…”, निलेश लंके यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

Spread the love