
Sharad Pawar । अमरावती : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. बोटावर मोजण्याइतपत आमदार आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी आहेत. परंतु त्यांनी न डगमगता पुन्हा पक्षबांधणीला (NCP) सुरुवात केली आहे. अजित पवार गटाने त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न केले तरीही त्यांनी आपले मत बदलले नाही. अशातच आता अजित पवार गटाच्या बड्या नेत्याने एक खळबळजनक दावा केला आहे. (Latest Marathi News)
पक्ष फुटून दोन महिने झाले तरी अजूनही या दोन्ही गटाचे नेते एकमेकांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी “शरद पवार यांच्यासोबत आजही माझे बोलणं होतं. मी त्यांच्या संपर्कात आहे”, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. ते अमरावतीमध्ये बोलत होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. पडद्यामागे नेमकं चाललंय काय? असा सवाल आता निर्माण होत आहे.
पुढे ते म्हणाले,” मागील वेळी मी शरद पवारांसोबत येथे आलो होतो. आज अजित पवारांसोबत येथे आलो आहे. अनेकांना असे वाटते की येथे आलो आहे की मला शरद पवारांनी पाठवले आहे. मी पक्षाच्या बळकटीसाठी येथे आलो आहे. शरद पवारांविषयी माझ्या मनात आदर आहे. ते माझे आजही नेते आहेत आणि पुढेही राहतील”, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.