Trending Video । धक्कादायक! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये तरुण घेतायेत ‘ड्रग्ज’, पहा व्हायरल व्हिडीओ

Shocking! Young people take 'drugs' in a train full of passengers, see viral video

Trending Video । मुंबई : हल्ली तरुणाई ड्रग्जच्या (Drugs) आहारी जाऊ लागली आहे. त्यामुळे त्यांचे आयुष्य तर उध्वस्त होतेच शिवाय इतरांचेदेखील आयुष्य उध्वस्त होते. याबाबत जनजागृती केली तरीही त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. दरम्यान, सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Video viral) होत आहे. ज्यामध्ये तरुण खुलेआम ड्रग्ज घेताना दिसत आहे, त्यामुळे सर्वांचीच झोप उडाली आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar । “शरद पवारांच्या मी अजूनही संपर्कात”, अजित पवार गटाच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ मुंबईच्या लोकलमधील (Mumbai Local) असल्याचे बोलले जात आहे. नालासोपारा स्टेशनच्या दरम्यान लोकलमध्ये ६ तरुण ड्रग्ज घेत आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे प्रवाशांनी खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये ते नशा करत आहेत. ट्विटरवर @ADARSH7355 नावाच्या अकाऊंटवर पोलीस आणि रेल्वे यंत्रणांना हादरवून टाकणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Twitter trending video)

या तरुणांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे पोलिसांना कसून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांचं पथक त्यांच्या मार्गावर आहे. त्यांना कधीही अटक होऊ शकते. दरम्यान, नागरिकांना या तरुणांपैकी कोणाला ओळखत असेल तर त्याची माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

PM Kisan Yojana । आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी खात्यात येणार 15 व्या हप्त्याचे पैसे, त्यापूर्वी करा महत्त्वाची कामे

Spread the love