PM Kisan Yojana । आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी खात्यात येणार 15 व्या हप्त्याचे पैसे, त्यापूर्वी करा महत्त्वाची कामे

Good news! The 15th installment money will come to the account on 'this' day, do important work before that

PM Kisan Yojana । केंद्र आणि राज्य सरकार (State Govt) शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. ज्याचा त्यांना फायदा होतो. त्यापैकीच सरकारची एक योजना म्हणजे पीएम किसान योजना (PM Kisan Scheme) होय. देशभरातील करोडो लोक सरकारच्या या योजनेचा लाभ घेत आहेत. जर तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल तर बातमी तुमच्या कामाची आहे. आतापर्यंत या योजनेचे 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. (Latest Marathi News)

Maratha Reservation : एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित आज मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची बैठक; नेमका काय होणार निर्णय?

त्यामुळे शेतकरी आता पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 15 व्या हप्त्याचे (15th installment) पैसे जमा केले जाणार आहेत. परंतु तुम्हाला त्यापूर्वी काही महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत. नाहीतर तुम्हाला या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत. या हप्त्यासाठी नवीन नोंदणी सुरू झाली आहे. तुम्ही pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुमच्या नावाची नोंदणी करू शकता.

Havaman Andaj । मोठी बातमी! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना आज यलो अलर्ट; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचे अपडेट

करा ही कामे

ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झाली नाही, बँक खाते आधारशी लिंक (Bank Aadhar Link) केले नाही, ज्यांनी अजूनही ई-केवायसी (E-KYC) केलेले नाही आणि जमिनीची कागदपत्रे अपलोड केली नसतील त्यांनी आजच ही महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्या, नाहीतर तुम्हाला देखील या योजनेच्या 15 व्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत.

Baramti News : जालना घटनेच्या निषेधार्थ आज बारामती बंदची हाक; जाणून घ्या मोर्चाचा मार्ग

या दिवशी खात्यात जमा होणार पैसे

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये या योजनेचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हप्ता येण्यापूर्वी काही महत्त्वाची कामे उरकून घ्या. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसेल.

Maratha Reservation । “फडणवीसांची भाजपमधून हकालपट्टी करा, नाहीतर ते मराठ्यांना गोळ्या घालून मारतील”

Spread the love