Maratha Reservation : जालन्यातील घटनेनंतर राज्यांमध्ये आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला तापला आहे. जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलनाला हिंसक वळण लागले असून ते आता औरंगाबाद, सोलापूर, नागपूर आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये पसरले आहे. मागच्या दोन-तीन दिवसापासून अनेक ठिकाणी मराठा समाज जालन्यातील घटनेचा निषेध करत आहे. (Maratha Reservation )
दरम्यान, आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत एक नियोजन जारी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी बैठक होणार आहे. या बैठकीला मराठा आरक्षण मंत्री, उपसमितीतील सर्व सदस्य मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत.
Baramti News : जालना घटनेच्या निषेधार्थ आज बारामती बंदची हाक; जाणून घ्या मोर्चाचा मार्ग
महत्वाची गोष्ट म्हणजे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरंगे पाटील यांना देखील सरकारने या बैठकीसाठी निमंत्रण दिले असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी सूत्रांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाबाबत नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Maratha Reservation । “फडणवीसांची भाजपमधून हकालपट्टी करा, नाहीतर ते मराठ्यांना गोळ्या घालून मारतील”
जालन्यातील घटनेचे राज्यभर पडसाद उमटले
जालन्यामध्ये झालेल्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेमुळे मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून ठिकठिकाणी आंदोलने देखील केली जात आहेत. अनेक जिल्हे तसे गावे या घटनेच्या निषेधार्थ बंद ठेवण्यात आले आहेत.
Sonia Gandhi । बिग ब्रेकिंग! सोनिया गांधी यांची तब्बेत अचानक बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
आज बारामती बंद
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. यानंतर राज्यभर याचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी याचा तीव्र निषेध देखील करण्यात आला आहे. सरकारी बस पेटवून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज (04 सप्टेंबर) बारामती बंदची हाक देण्यात आली आहे. ज्यामध्ये बारामती शहर आणि काही ग्रामीण भागात आज बंद पाळला जाणार आहे.