Agriculture News । मिळवायचा असेल लाखोंचा नफा तर आजच करा बांबूची शेती, सरकारही करेल मदत

If you want to earn lakhs of profit, do bamboo farming today, the government will also help

Agriculture News । शेतकरी वर्ग आता पारंपरिक पिके न घेता आधुनिक पिकांकडे वळाला आहे. नवनवीन प्रयोग ते शेतीमध्ये (Agriculture) करू लागले आहेत. योग्य नियोजन आणि बाजाराच्या अभ्यासामुळे त्यांना अलीकडच्या काळात लाखो रुपयांची कमाई करता येत आहे. आज अनेकजण बांबूची लागवड (Plantation of bamboo) करून चांगली कमाई करत आहेत. आता तुम्हीही ही शेती करू शकता. (Latest Agriculture News)

Sharad Pawar । “शरद पवार खुनी आहेत”; टीका करताना शिवसेनेच्या बड्या नेत्याची घसरली जीभ

विशेष म्हणजे जर तुमच्याकडे बांबूच्या लागवडीसाठी (Bamboo cultivation) पैसे नसतील तर सरकार तुम्हाला आर्थिक मदत करेल. तुम्ही सरकारी मदत घेऊन ही शेती करू शकता. खरंतर बांबूची लागवड ग्रामीण आणि आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर केली जाते. लागवडींनंतर तुम्हाला अवघ्या तीन ते चार वर्षातच नफा मिळू लागतो. जर तुम्ही योग्य नियोजन केले तर पुढील 60 ते 70 वर्षे नफा मिळेल.

Kirit Somaiya । किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

अशी करा लागवड

लागवड करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. शेतामध्ये 3 x 2.5 मीटर दराने बांबूची (Bamboo) लागवड करावी. एका हेक्टर शेतीवर 625 रोपं चार मीटरच्या अंतरावर लावू शकता. समजा तुम्ही 4*4 मीटर दराने दुसरे पीक घेतले तर तुम्हाला एकूण 25-30 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. त्याशिवाय तुम्हाला या बांबूच्या दर 4 वर्षांनी 3 ते 3.5 लाख रुपयांचे उत्पन्न सहज मिळेल.

Manoj Jarange । आताची सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; उपोषण मंडपातच लावली सलाईन

सतत मिळेल नफा

सातत्याने नफा मिळवून देणारं पीक अशी या पिकाची ओळख आहे. समजा तुम्ही एका हेक्टर शेतीवर 625 रोपे चार मीटरच्या अंतरावर लावली तर पाचव्या वर्षी 3125 बांबू वर्षाला तर आठव्या वर्षी 6250 बांबू दरवर्षी मिळतात. याची विक्री करून शेतकऱ्यांना वार्षिक पाच ते सात लाख प्रति हेक्‍टर रुपयांचा नफा मिळेल.

Havaman Andaj । आनंदाची बातमी! पुन्हा मान्सून सक्रीय होणार; जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

खतांची गरज नाही

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या शेतीसाठी कोणत्याही प्रकारच्या खतांची किंवा कोणत्या प्रकारचे कीटकनाशकाची गरज पडत नाही. ही शेती केल्याने मृदा संरक्षण होते. बांबू पीक पर्यावरणाचं मोठ्या प्रमाणावर रक्षण करते. बांबू वातावरणातील 66 टक्के कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतो आणि तितकाच ऑक्सिजन वातावरणात सोडतो.

Viral Video On Social Media । रेल्वे स्टेशनवर दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

Spread the love