Satara Loksabha । मोठी बातमी! लोकप्रिय अभिनेत्रीचा शरद पवार गटात प्रवेश

Satara Loksabha

Satara Loksabha । सातारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहे. अशातच नेत्यांच्या गाठीभेटी देखील खूप वाढल्या आहेत. अनेक नाराज नेते तिकीट नाकारल्याने दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. (Satara Loksabha Election)

Sharad Pawar । “होय, मी भटकती आत्मा…”; शरद पवारांचं मोदींना प्रत्युत्तर

अशातच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangde) यांनी शरद पवार गटात (Sharad Pawar Group) प्रवेश केला आहे. त्या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून लोकांच्या घराघरात पोहोचल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारादरम्यान अश्विनी महांगडे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला.

Nana Patole | राजकीय वर्तुळात मोठी खळबळ, फडणवीसांवर टीका करताना नाना पटोलेंची घसरली जीभ; म्हणाले…

“शेतकऱ्यांना विचारतं कोण? केवळ शरद पवारसाहेबच शेतकऱ्यांना विचारतात. माझे वडील शेवटपर्यंत साहेबांचंच काम करत होते. त्यामुळे मी त्यांचा झेंडा हाती घेताना मला खूप अभिमान वाटत आहे. कुठेतरी माझ्या वडिलांचं स्वप्न होतं, त्या दृष्टीने मी पाऊल टाकलं आहे. ही निवडणूक देशाची आहे असं बोललं जात असताना प्रश्नही तसेच पडायला हवे,” असे अश्विनी महांगडे म्हणाल्या.

Amol Kolhe । अमोल कोल्हेंना मोठा धक्का, अपक्ष उमेदवारालाच मिळालं तुतारी चिन्ह

Spread the love