Sharad Pawar । “होय, मी भटकती आत्मा…”; शरद पवारांचं मोदींना प्रत्युत्तर

Sharad Pawar

Sharad Pawar । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक बडे नेते सभा घेत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहे. नेत्यांच्या गाठीभेटी देखील वाढल्या आहेत. अनेक नेते सभांदरम्यान एकमेकांवर जहरी टीका करत आहेत. (Latest marathi news)

Nana Patole | राजकीय वर्तुळात मोठी खळबळ, फडणवीसांवर टीका करताना नाना पटोलेंची घसरली जीभ; म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल शरद पवार हे भटकती आत्मा असून त्यांनी राज्य अस्थिर ठेवल्याचा आरोप केला होता. मोदींच्या या आरोपाला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “होय, मी भटकती आत्मा आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी आहे.जनतेसाठी मी शंभरवेळा अस्वस्थ राहील,” असे शरद पवार म्हणाले आहेत. (Sharad Pawar on Narendra Modi)

Amol Kolhe । अमोल कोल्हेंना मोठा धक्का, अपक्ष उमेदवारालाच मिळालं तुतारी चिन्ह

शरद पवारांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे. “राहुल गांधींच्या तीन पिढ्या देशासाठी झटल्या आहेत. देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी झटले आहेत. गरिबी हटविण्यासाठी इंदिरा गांधींची हत्या झाली. आधुनिकेतवर देश पुढं जावा, यासाठी लढा उभारणाऱ्या राजीव गांधींची हत्या झाली. वडील आणि आज्जींनी देशासाठी बलिदान दिलं. त्या राहुल गांधींना म्हणतात साहबजादे काय करणार? नरेंद्र मोदींना कायतरी वाटायला हवं,” असं प्रत्युत्तर शरद पवारांनी दिले आहे.

Rally Campaign । मोठी बातमी! मुंबईचं राजकीय वातावरण पेटलं, भाजपच्या प्रचार रॅलीवर दगडफेक

Spread the love