Rally Campaign । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक बडे नेते सभा घेत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहे. नेत्यांच्या गाठीभेटी देखील वाढल्या आहेत. अनेक नेते पक्षांतर करत असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. (Latest marathi news)
Accident News । बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी
सध्या एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. महायुतीचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांच्या रॅलीवर दगडफेक झाली आहे. देवनार गौतमनगर परिसरात रॅली दरम्यान हा प्रकार घडला असून याप्रकरणी देवनार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर शाब्दिक वार करतात. पण अशातच आता दगडफेकीची घटना घडली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्यात लढत होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत सर्वच पक्ष जोरात प्रचार करत आहेत. अशातच मिहिर कोटेचा यांच्या रॅलीवर दगडफेक झाली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
Sharad Pawar । राजकारणातून मोठी बातमी! शरद पवार यांचा सर्वात मोठा दावा