Manoj Jarange Protest । “मराठा आरक्षणाबाबत आज निर्णय घेतला नाही तर…”; मनोज जरांगे यांनी दिला सरकारला गंभीर इशारा

"If a decision is not taken today regarding Maratha reservation..."; Manoj Jarange gave a serious warning to the government

Manoj Jarange Protest । जालना : जालन्यातील अंतरवाली सराटी गावात पोलिसांनी मराठा समजातील आंदोलकवर लाठीचार्ज केल्याने (Jalana Protest) मागील काही दिवसापासून राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. विशेष म्हणजे मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरु आहे. आज त्यांची डॉक्टरांनी तपासणी केली. त्यानंतर त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. (Jalana News)

Uorfi Javed । कहरच! उर्फीचा ‘हा’ व्हिडीओ पाहून युजर्सना फुटला घाम, अभिनेत्रीने चक्क घातला…

मनोज जरांगे यांनी आजपासून उपोषण आणखी तीव्र केले आहे. “आम्ही सरकारच म्हणणं ऐकत आहे, त्यांना वेळोवेळी चांगला प्रतिसादही देत आहे. परंतु आज जर त्यांनी कोणता निर्णय घेतला नाही तर पाणीही घेणार नाही”, अशी आक्रमक भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. तसेच “आज आम्हाला न्याय मिळेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

Adulterated milk । नागरिकांच्या जीवाशी खेळ, भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश

आज निर्णय होणार?

दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणाच्या उपसमितीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. याबाबत अभ्यास करण्यासाठी महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अकरा जणांची समिती गठीत केली होती. त्यामुळे आज मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखला देण्याच्या संदर्भात निर्णय होऊ शकतो.

Trending Video । धक्कादायक! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये तरुण घेतायेत ‘ड्रग्ज’, पहा व्हायरल व्हिडीओ

रास्तोरोको आंदोलन

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. याचे पडसाद औरंगाबाद, सोलापूर, नागपूर आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये उमटल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाजाकडून रास्तोरोको आंदोलन केले जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्याच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar । “शरद पवारांच्या मी अजूनही संपर्कात”, अजित पवार गटाच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Spread the love