Heat wave | सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बिहारमधील शेखपुरा, बेगुसराय आणि मोतिहारी (पूर्व चंपारण) या तीन जिल्ह्यांतील विविध शाळांमध्ये बुधवारी उष्णतेमुळे किमान 50 विद्यार्थी बेहोश झाले.शेखपुरा येथील मानकोळ गावातील सरकारी शाळेच्या आवारात 24 विद्यार्थी बेशुद्ध झाले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेले. या घटनेने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मुख्य रस्ता रोखून धरला.
Pune Porsche Accident । पुणे अपघात प्रकरणात सर्वात मोठी बातमी समोर!
मूळच्या माणकोळ गावच्या रहिवासी असलेल्या सविता देवी आणि एका विद्यार्थ्याच्या पालकांनी सांगितले की, “शिक्षकांनी सांगितले की विद्यार्थी शाळेत बेहोश झाले आहेत. आम्ही शाळेत पोहोचलो तेव्हा आम्ही पाहिले की अनेक मुले बेशुद्ध अवस्थेत होती. काही मुले मोठ्याने रडत होती. आम्ही वाहनांची व्यवस्था केली आणि विद्यार्थ्यांना सदर रुग्णालयात नेले.
बेगुसरायमध्ये 20 विद्यार्थी बेशुद्ध झाले आणि त्यांना सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचप्रमाणे मोतिहारी येथील शाळेतही अनेक विद्यार्थी बेशुद्ध पडले. कडक ऊन असूनही उन्हाळी सुट्ट्या जाहीर केल्या जात नसल्याचं सांगत संतप्त पालकांनी शिक्षण विभागाचा निषेध केला.