Govinda । 1000 कोटींच्या ऑनलाइन घोटाळ्यात गोविंदाचं नाव, मुख्य आरोपीच्या अटकेनंतर अभिनेत्याचं काय होणार?

Govinda's name in 1000 crore online scam, what will happen to the actor after the arrest of the main accused?

Govinda । सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असणारा बॉलिवूडचा स्टार अभिनेता गोविंदा आता एका वेगळ्याच कारणावरून चर्चेत आला आहे. ते म्हणजे १००० कोटींच्या ऑनलाइन घोटाळ्यामुळे. पाँझी घोटाळ्यात (Ponzi scams) या अभिनेत्याचे नाव समोर आले आहे. त्यामुळे मनोरंजन विश्वात (Entertainment) एकच खळबळ उडाली आहे. वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. (Entertainment News)

Ajit Pawar । अखेर ठरलं! अजितदादांचा मुलगा पार्थ पवार ‘या’ मतदारसंघातून लढवणार लोकसभा निवडणूक

आर्थिक गुन्हे शाखेकडून पाँझी घोटाळ्यातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्यात एकूण 2 लाखांपेक्षा जास्त लोकांची तब्बल 1000 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. तर आतापर्यंत सोलर टेक्नो अलायन्स अनेक देशांत क्रिप्टो गुंतवणुकीच्या बहाण्याने ऑनलाइन पाँझी ही योजना (Online Ponzi Scheme) चालवली होती. हा घोटाळा उघड झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Dombivli News । धक्कादायक बातमी! डोंबिवलीमध्ये कोसळली तीन मजली इमारत, नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

गोविंदाने या कंपनीच्या काही प्रमोशनल व्हिडीओंचा प्रचार केला होता. त्यात तो व्हिडीओमध्ये स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. सध्या गोविंदाने या कंपनीला प्रोत्साहन आणि पाठिंबा दिल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे त्याला आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स जारी केले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर या अभिनेत्याला चौकशीसाठी ओडिशात बोलावले जाऊ शकते.

Accident News । भयानक दुर्घटना! लिफ्ट कोसळून ४ जणांचा जागीच मृत्यू तर ५जण गंभीर जखमी

Spread the love