Eknath Shinde । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांनी घेतला मोठा निर्णय; ‘या’ दोन जिल्ह्यांची बदलली नावे

Chief Minister Eknath Shinde took the biggest decision before the cabinet meeting!

Eknath Shinde । छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या (Marathwada Liberation Day) पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचं निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळ आणि प्रशासन संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहे. परंतु त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

Govinda । 1000 कोटींच्या ऑनलाइन घोटाळ्यात गोविंदाचं नाव, मुख्य आरोपीच्या अटकेनंतर अभिनेत्याचं काय होणार?

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) या दोन शहरांची नावे बदलली आहेत. आता या दोन्ही जिल्ह्यांचीदेखील नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद शहरानंतर आता जिल्ह्याचदेखील छत्रपती संभाजीनगर असे नाव केले आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव बदलून धाराशिव (Dharashiv) केले आहे. लवकरच एकनाथ शिंदे याबाबत घोषणा करतील.

Ajit Pawar । अखेर ठरलं! अजितदादांचा मुलगा पार्थ पवार ‘या’ मतदारसंघातून लढवणार लोकसभा निवडणूक

दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांच्या राहण्याची सोय फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये करण्यात आली होती. या हॉटेलचे एका दिवसाचे भाडे हे 32 हजार रुपये आहे. परंतु मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडला असताना कोट्यवधी रुपये खर्च होत असल्याने विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपला मुक्काम फाईव्ह स्टार हॉटेलमधून शासकीय विश्रामगृहात हलवला.

Dombivli News । धक्कादायक बातमी! डोंबिवलीमध्ये कोसळली तीन मजली इमारत, नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Spread the love