Gopichand Padalkar । पडळकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार समर्थक आक्रमक; दिसेल तिथे चोप देणार असल्याचा दिला गंभीर इशारा

Gopichand Pdalkar on ajit pawar

Gopichand Padalkar । भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अगदी खोचक शब्दांमध्ये टीका केली होती. अजित पवार लबाड लांडग्याचे पिल्लू तर सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक अशी खोचक टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Gopichand Padalkar)

Allu Arjun । अल्लू अर्जूनच्या मुलीने असं काय केलं की सर्वत्र तिच्याच नावाची होतेय चर्चा, जाणून घ्या

गोपीचंद पडळकर ज्या ठिकाणी दिसतील त्या ठिकाणी त्यांना चोप देणार असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पडळकरांविरोधात ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत.

Maharastra Rain । ‘या’ जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती अतिशय भयंकर; जास्त किमतीने खरेदी करावा लागतोय हिरवा चारा

नेमकं प्रकरण काय?

सध्या धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न देखील चर्चेत आहे. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पडळकर यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून धनगर समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधले. याबाबत पत्रकारांनी त्यांना तुम्ही अजित पवारांना पत्र का नाही पाठवलं? असे विचारले यावर पडळकर उत्तर देत म्हणाले, अजित पवारला लबाड लांडग्याचे पिल्लू आहे. त्यामुळे पडळकरांच्या वक्तव्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. पडळकर यांच्या वक्तव्याचे अनेक ठिकाणी पडसाद उमटत आहेत. त्यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जाहीर निषेध देखील करत आहेत.

Bacchu Kadu । आधी वादग्रस्त वक्तव्य आणि नंतर बच्चू कडूंचा माफीनामा, म्हणाले; “माझा शब्द..”

पुण्याच्या मावळमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटले आहेत. अजित पवारांचे समर्थक थेट जुन्या पुणे मुंबई महामार्ग उतरले आहेत. सोमटणे फाटा या ठिकाणी त्यांनी पडळकरांच्या फोटोला जोडे मारूनआंदोलन केल आहे. त्याचबरोबर वेळोवेळी विनाकारण अजित पवारांवर भाष्य करणाऱ्या पडळकर यांना पुणे जिल्ह्यात फिरू देणार नाही असा गंभीर इशारा देखील या कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर पडळकर दिसतील त्या ठिकाणी आम्ही त्यांना चोप देऊ अशी आक्रमक भूमिका आता अजित पवार यांच्या समर्थकांनी घेतली आहे.

Success Story । तरुणाचा नादच खुळा! सासरच्यांकडून शिकून दोन बिघा शेतात सुरू केली परवलची शेती, महिन्याला ५० हजार रुपयांपर्यंत कमाई

Spread the love