Shivsena Crisis । आमदार अपात्रतेबाबत वेळकाढूपणा विधानसभा अध्यक्षांना भोवला! सुप्रीम कोर्टाने दिले थेट ‘हे’ आदेश

Disqualification of the MLAs has caused delay to the Speaker of the Vidhan Sabha! The Supreme Court gave direct 'this' order

Shivsena Crisis । नवी दिल्ली : राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल अजूनही लागला नाही. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) हा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवला होता. परंतु चार महिने होऊनही राहुल नार्वेकर यांनी याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. आज या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. (Shivsena MLA Disqualification Case)

“अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू तर सुप्रिया सुळे लबाड लांडग्याची लेक”, गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली; नवीन वाद निर्माण होणार?

राहुल नार्वेकर यांच्या कामकाजांवर सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले आहेत. त्यांना एका आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुनावणीदरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी सुप्रिम कोर्टाच्या आदेशाचा मान राखायला हवा होता, असे महत्वाचे निरिक्षण नोंदवण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्षांना निकालासाठी अवघा एक आठवडा कालवधी कोर्टाने दिला आहे. (Latest Marathi News)

Allu Arjun । अल्लू अर्जूनच्या मुलीने असं काय केलं की सर्वत्र तिच्याच नावाची होतेय चर्चा, जाणून घ्या

विधानसभा अध्यक्षांनी आता एका आठवड्यामध्ये सुनावणी करून कार्यवाही करून दोन आठवड्यानंतर त्याबाबतची संपूर्ण माहिती सुप्रीम कोर्टात द्यावी. यावेळी कोर्टाच्या निर्णयाचा आदर राखला जाईल, अशी अपेक्षा कोर्टाने व्यक्त केली आहे. त्यामुळे आता एका आठवड्यात शिवसेनेचे १६ आमदार अपात्र होणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Dasun Shanaka । लाजिरवाण्या पराभवानंतर श्रीलंकेच्या कर्णधाराने केलं असं काही की.. क्रिकेटप्रेमीही झाले भावूक

Spread the love