Amruta Fadnavis । मोठी बातमी! अमृता फडणवीस खंडणीप्रकरणी अनिल जयसिंघानीला जामीन मंजूर

Amruta Fadanvis

Amruta Fadnavis । मागच्या काही दिवसात पासून अमृता फडणवीस खंडणी प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून खंडणी वसूल केल्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली होती. मात्र आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. बुकी अनिल जयसिंघानीला (Bookie Anil Jaisinghani) सोमवारी मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Havaman Andaj । गणपतीच्या स्वागतासाठी पावसाची दमदार हजेरी; ‘या’ ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

पन्नास हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्याच्या सशक्त जामीनावर न्यायालयाकडून अनिल जयसिंघानीयाची सुटका करण्यात आली आहे. जामीन मंजूर झाला असला तरी प्रत्येक सुनावणीला आरोपीची हजेरी अनिवार्य असल्याचे देखील न्यायालयाने म्हटले आहे. त्याचबरोबर साक्षीदारांना न धमकवण्याची निर्देश देखील न्यायालयाने जयसिंघानीला दिले आहेत.

Gopichand Padalkar । पडळकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार समर्थक आक्रमक; दिसेल तिथे चोप देणार असल्याचा दिला गंभीर इशारा

या खंडणी प्रकरणांमध्ये जयसिंघानीयाची मुलगी आणि भाऊ यांची देखील नावे समोर होती. त्यांना देखील अटक करण्यात आली होती मात्र. या आरोपींना या आधीच न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता. याप्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यामध्ये यावर्षी २० फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमृता फडणवीस यांनी हा गुन्हा दाखल केला होता.

Allu Arjun । अल्लू अर्जूनच्या मुलीने असं काय केलं की सर्वत्र तिच्याच नावाची होतेय चर्चा, जाणून घ्या

Spread the love