Lok Sabha Elections । राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Elections 2024) पार पडणार आहेत. सर्व पक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग (Central Election Commission) कधीही निवडणुका जाहीर करू शकते. यंदाच्या निवडणुकीवर सर्वांचे विशेष लक्ष असणार आहे. अशातच आता लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. (Latest marathi news)
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीतील भाजप खासदार गौतम गंभीरने (Gautam Gambhir) राजकारणाला रामराम ठोकला आहे. त्याने भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांना एक्सवर पोस्ट करून याची माहिती दिली आहे. ‘मला जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद!’, अशा आशयाची पोस्ट गौतम गंभीरने केली आहे.
गंभीरच्या या पोस्टवरून तो आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. गंभीरने आता राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. पण निवडणुकीपूर्वीच त्याने पक्षाला रामराम ठोकल्याने भाजपासाठी हा खूप मोठा धक्का असणार आहे. गौतम गंभीरच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
Pakistan Lashkar Terrorist । मोठी बातमी! 26/11 च्या आणखी एका मास्टरमाइंडचा पाकिस्तानात खात्मा