Maharashtra politics । सर्वात मोठी बातमी! भाजपच्या मंत्र्यावर मारहाणीचा आरोप, भाजप पदाधिकाऱ्यानेच तक्रार दिल्याने खळबळ

Maharashtra politics

Maharashtra politics । राज्याचे राजकारण दिवसेंदिवस वेगळे वळण घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक दिग्ग्ज नेते,पदाधिकारी तसेच कार्यकर्ते पक्षांतर करत आहेत. अशातच आता एक खळबळजनक बातमी राजकीय वर्तुळातून समोर आली आहे. भाजपच्या एका मंत्र्यावर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्याच्या विरोधात भाजप (BJP) पदाधिकाऱ्यानेच तक्रार दिली आहे. (Latest marathi news)

Lok Sabha Elections । भाजपला मोठा धक्का! निवडणुकीपूर्वी माजी खेळाडूने ठोकला राजकारणाला राम राम

छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघाचे भाजप आमदार आणि मंत्री अतुल सावे (Atul Save) यांच्यावर भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबईच्या मरीन ड्राइव्ह पोलिस (Marine Drive Police) ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशीदेखील मागणी करण्यात आली आहे.

Manoj Jarange Patil । मोठी बातमी! जरांगे पाटलांची पुन्हा खालावली प्रकृती, पहिल्यांदाच होतोय ‘हा’ त्रास, डॉक्टर म्हणाले…

तक्रारदार आसाराम डोंगर हे अतुल सावे यांना भेटायल गेले असताना, मंत्र्यांनी ‘तू देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंच्या संपर्कात राहतोस यावरून मारहाण केल्याचे’ तक्रारीत म्हटले आहे. फक्त मंत्र्यांनीच नाही तर त्यांच्या दोन स्वीय सहाय्यक यांनीही मारहाण केली आहे, असा गंभीर आरोप आसाराम डोंगरे (Asaram Dongre) यांनी केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Devendra Fadnavis । फडणवीसांची शरद पवारांवर जहरी टीका, म्हणाले; “पवारांच्या आशीर्वादानेच मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष, आता….”

Spread the love