Pakistan Lashkar Terrorist । मोठी बातमी! 26/11 च्या आणखी एका मास्टरमाइंडचा पाकिस्तानात खात्मा

Pakistan Lashkar Terrorist

Pakistan Lashkar Terrorist । पाकिस्तान (Pakistan) सतत भारतावर कुरघोडी करत असते. पाकिस्तानने आतापर्यंत भारतावर अनेक हल्ले केले आहेत. भारताने देखील त्याला प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानने मुंबईमध्ये 2008 साली खूप मोठा हल्ला केला होता. (Pakistan Terrorist) या हल्ल्यात अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेला होता. अशातच आता पाकिस्तानच्या जिहादी वर्तुळात एका वेगळ्या कारणावरून चर्चा सुरु झाल्या आहेत. (Latest marathi news)

Maratha Reservation । सर्वात मोठी बातमी! मराठा समाजाने घेतलेले 10 महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने मंजूर

26/11’चा मास्टरमाइंड पाकिस्तानातील फैसलाबाद येथे लष्कराचा गुप्तचर प्रमुख आझम चीमा (Azam Cheema) याच्या मृत्यूची बातमी समोर आली असून त्याचे वय 70 वर्षे होते. तो 26/11 च्या दहशतवादी हल्ला (26/11 terrorist attack), जुलै 2006 च्या मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट आणि भारतातील इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांचा प्रमुख सूत्रधार होता. त्याच्या मृत्यूची बातमी समोर येताच भारतीय यंत्रणांच्या दाव्याला बळ मिळाले आहे.

Supriya Sule । सुप्रिया सुळेंनी जाहीर केली बारामतीतून उमेदवारी? व्हॉटसअ‍ॅप स्टेटसवरून रंगलीय चर्चा

गुप्तचर सूत्रांच्या माहितीनुसार, तो पंजाबी बोलत होता आणि तो लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी होता. तो 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला पाकिस्तानातील बहावलपूर येथे पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता. विशेष म्हणजे अनेकदा सहा अंगरक्षकांसह लँड क्रूझरमध्ये फिरताना दिसत होता. पण इस्लामाबादने या बाबत नकार दिला आहे.

Shiv Sena MLA Disqualifications । ठाकरे गटाला न्यायालयाचा मोठा दिलासा! ‘त्या’ याचिकेवर लवकरच होणार सुनावणी

Spread the love