Cabinet Expansion । अखेर मुहूर्त मिळाला! पुढच्या आठवड्यात होणार मंत्रिमंडळाचा विस्तार?

Finally got the time! Cabinet expansion next week?

Cabinet Expansion । पुणे : एका वर्षांपूर्वी सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी लगेच एका मंत्रिमंडळाचीही स्थापना करून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार (State Cabinet Expansion) केला जाईल, असे आश्वासन दिले. परंतु, सत्ता येऊन एक वर्ष पूर्ण झाले तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार केला नाही. (Latest Marathi News)

Amit Shah Pune Visit । अमित शहांचा आज पुणे दौरा, ‘हे’ रस्ते असतील बंद

यासंदर्भात वरिष्ठ नेत्यांशीही चर्चा करण्यात आली. परंतु, विस्ताराबाबत फक्त चर्चा होत असल्याने सरकारला विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सत्तेत सामील झाला आहे. त्यामुळे त्यांनाही मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी केले जाणार असल्याने शिंदे गटामध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

Beekeeping Attack । धक्कादायक! मधमाशांच्या हल्ल्यात ५ जणांचा मृत्यू

सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यामध्ये होऊ शकतो. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीमधील केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा झाली आहे. अनेकजण मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी लॉबिंग सुरू झाले आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार का? की जुन्या चेहऱ्यांना संधी मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Sharad Pawar । शरद पवार ॲक्शन मोडमध्ये! येवल्यातील सभेनंतर आता बीडमध्ये सभा

दरम्यान, राज्याचे पावसाळी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनापूर्वीच हा विस्तार होईल असे बोलले जात होते. त्याबाबत फॉर्म्युलाही समोर आला होता. परंतु विस्तार झाला नाही. राज्याच्या आगामी निवडणुकांना फक्त 7 ते 8 महिने बाकी असून आता या पार्श्वभूमीवर हा विस्तार होईल, असे सांगण्यात येत आहे.

Gadar 2 | प्रदर्शित होण्याअगोदरच ‘गदर 2’चा बंपर धमाका; विकली गेली तब्बल ‘इतकी’ तिकीट

Spread the love