NCP Crisis । पुन्हा राजकीय भूकंप, राष्ट्रवादीचा आणखी एक गट फुटण्याच्या तयारीत; जयंत पाटलांच्या नावाची चर्चा

Another political earthquake, another group of nationalists ready to break out; Discussion of Jayant Patal's name

NCP Crisis । सांगली : विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेले अजित पवार (Ajit Pawar) यांनी अचानक शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) आतापर्यंतची सगळ्यात मोठी फूट पडली. पक्षात अजित पवार आणि शरद पवार (Sharad Pawar) असे दोन गट निर्माण झाले आहेत. शरद पवारांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अजित पवारांसोबत गेल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Latest Marathi News)

Cabinet Expansion । अखेर मुहूर्त मिळाला! पुढच्या आठवड्यात होणार मंत्रिमंडळाचा विस्तार?

अजित पवारांनी आता पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावरही दावा केला आहे. तरीही शरद पवार खचले नाही. त्यांनी आपल्या काही सहकारी नेत्यांना हाताशी घेत पुन्हा पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर लवकरच ते महाराष्ट्रात दौरे करणार आहेत. अशातच आता १५ ऑगस्टनंतर राज्यात पुन्हा एकदा खूप मोठा राजकीय भूकंप घडणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

Amit Shah Pune Visit । अमित शहांचा आज पुणे दौरा, ‘हे’ रस्ते असतील बंद

राष्ट्रवादीचा आणखी एक गट फुटण्याच्या तयारीत आहे. रिक्त असलेले एक मंत्रिपद या गटाला दिले जाईल. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), आमदार मानसिंगराव नाईक (Mansingrao Naik) यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. जयंत पाटील हे शरद पवार यांचे खूप जवळचे नेते आहेत, जर तेच अजित पवार गटात गेले तर शरद पवारांना खूप मोठा धक्का बसेल.

Beekeeping Attack । धक्कादायक! मधमाशांच्या हल्ल्यात ५ जणांचा मृत्यू

Spread the love