
Sharad Pawar । अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली/. शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. यानंतर शरद पवारांनी पक्ष उभारणीचादेण्याचा निश्चय केला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांची पहिली सभा छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यामध्ये संपन्न झाली. दरम्यान आता त्यांची दुसरी सभा बीडमध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
Genelia’s birthday । जिनिलीयाच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखने शेअर केली खास पोस्ट; म्हणाला..
अजित पवारांनी बंड केल्यानंतर शरद पवारांनी खचून न जाता असे प्रसंग आपल्या आयुष्यात यापूर्वी देखील आलेले आहेत असे सांगत लढण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांनी येवल्यामध्ये पहिली सभा घेऊन रणसिंग फुंकले होतं. (Sharad Pawar)
Gadar 2 | प्रदर्शित होण्याअगोदरच ‘गदर 2’चा बंपर धमाका; विकली गेली तब्बल ‘इतकी’ तिकीट
शरद पवार यांची आता येवल्यानंतर दुसरी सभा बीडमध्ये होणार आहे. बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे सभेची जबाबदारी देण्यात आली आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी आगामी दौऱ्या बाबत चर्चा केली. याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे. दरम्यान सध्या शरद पवार यांच्या बीड सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Salman Khan । भाईजानलाही ‘बार्बी’ची भुरळ! हटके लूक पाहून नेटकरी कोड्यात, पहा व्हायरल व्हिडिओ