Amit Shah Pune Visit । अमित शहांचा आज पुणे दौरा, ‘हे’ रस्ते असतील बंद

Amit Shah's visit to Pune today, 'these' roads will be closed

Amit Shah Pune Visit । पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या हस्ते बहुराज्यीय सहकार संस्थांसाठी तयार केलेले वेब पोर्टलचे उद्घाटन होणार आहे. तसेच ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून यावेळी कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित राहणार आहेत.

Beekeeping Attack । धक्कादायक! मधमाशांच्या हल्ल्यात ५ जणांचा मृत्यू

मागील काही दिवसांपासून भाजप नेत्यांचे पुणे शहरावर जास्त लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे लोकमान्य टिळक पुरस्कार कार्यक्रमाच्या निमित्तीने शहरात येऊन गेले. त्यानंतर आता लगेच अमित शाह येणार असल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागल्या आहे. आज शहरातील सकाळी ६ वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत वाहतुकीत मोठे बदल असणार आहेत.

Sharad Pawar । शरद पवार ॲक्शन मोडमध्ये! येवल्यातील सभेनंतर आता बीडमध्ये सभा

महावीर चौक : महावीर चौकाकडून चिंचवड गावाकडे जात असणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांव प्रवेश बंदी असेल. पर्यायी मार्गावरून या वाहनांना महावीर चौकाकडून खंडोबा माळ चौक येथून जाता येईल.

Gadar 2 | प्रदर्शित होण्याअगोदरच ‘गदर 2’चा बंपर धमाका; विकली गेली तब्बल ‘इतकी’ तिकीट

रिव्हर व्ह्यू चौक: अहिंसा चौक बाजूकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी असेल. त्यामुळे या वाहनांना या चौकाकडून वाल्हेकरवाडी, बिजलीनगरमार्गे जाता येईल.

Genelia’s birthday । जिनिलीयाच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखने शेअर केली खास पोस्ट; म्हणाला..

दर्शन हॉल लिंक रोड : लिंकरोडकडून अहिंसा चौकाकडे येत असणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांवर प्रवेशबंदी असेल. त्यांना मोरया हॉस्पिटल चौकाकडून जाता येईल.

पुण्यात फिरायला जात असाल तर नक्की खा ‘हे’ चविष्ट पदार्थ, पाहूनच तोंडाला सुटेल पाणी

Spread the love