Eknath Shinde । यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण या ठिकाणी शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होत असून यामध्येच आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. अजित पवार यांचे कट्टर राजकीय विरोधक शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare ) यांनी बारामतीतून (Baramati ) आपण निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मात्र सध्याची राजकीय स्थिती पाहिली तर शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीत एकत्र आहे. त्यामुळे महायुतीमध्ये एकत्र असल्याने विजय शिवतारे यांच्या भूमिकेवर वारंवार अक्षय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता विजय शिवतारे नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. यामध्येच आता शिवतारे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना एक मोठं वक्तव्य केल आहे.
काय म्हणाले विजय शिवतारे?
शिवसेनेतून बाहेर पडणार का असा प्रश्न पत्रकारांनी विजय शिवतारे यांना विचारला. यावेळी बोलताना विजय शिवतारे म्हणाले, एकनाथ शिंदे आणि माझे घनिष्ठ नाते आहे. दोन-चार महिने त्यांची अडचण झाली आहे. मला लोकसभा निवडणूक लढवायची आहे. मात्र महायुतीमध्ये आपल्याला जागा तर सुटणार नाही. त्यांना अडचण आहे म्हणून मी बाहेर पडतोय. मात्र 25 वर्षाची सोबत आहे आणि ती कायम असणार आहे. मी लोकसभेत विजय होणार असं विजय शिवतारे म्हणाले आहेत.
BJP Candidate List । ब्रेकिंग! भाजपनं जाहीर केली चौथी यादी, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळाली संधी
विजय शिवतारे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. शिवतारे खरंच एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार का? असा मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. जर शिवतारे यांनी एकनाथ शिंदे यांची साथ सोडली तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का मानला जाईल. दरम्यान शिवतारे पुढील भूमिका काय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Loksabha Elections 2024 । सातारच्या राजकारणात मोठी खळबळ! उदयनराजे भोसले नाराज, दिल्लीत ठोकला तळ