BJP Candidate List । ब्रेकिंग! भाजपनं जाहीर केली चौथी यादी, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळाली संधी

BJP Candidate List

BJP Candidate List । राज्यात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणुकीपूर्वी राज्यात नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. भाजपकडून (BJP) निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. नुकतीच भाजपने चौथी यादी जाहीर केली असून यात 14 उमेदवारांना संधी दिली आहे. तसेच भाजपने एका प्रसिद्ध अभिनेत्रीला देखील उमेदवारी दिली आहे. (BJP Candidate Fourth List)

Topers Ad

Ajit Pawar । सुप्रिया सुळेंबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट

भाजपने तमिळनाडूतील अभिनेत्री राधिका सरथकुमारला (Radhika Sarathkumar) उमेदवारी दिली असून त्या विरूदनगर येथून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, भाजपने आपली तिसरी यादी 21 मार्च रोजी जाहीर केली होती, यात एकूण 9 उमेदवारांचा समावेश होता. यामध्ये भाजप नेते आण्णामलाई (Annamalai) यांचा देखील समावेश आहे. ते कोईंबतूरमधून निवडणूक लढवणार आहे. (Latest marathi news)

Mumbai News । धक्कादायक बातमी! वडिलांचा पीएफ मागितल्यावर कंपनीच्या एचआरने मुलीकडे केली सेक्सची मागणी

भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये राज्यातील एकाही उमेदवाराचं नाव नव्हतं. इतकेच नाही तर चौथ्या यादीमध्ये देखील राज्यातील एकाही उमेदवाराचं नाव नाही. विशेष म्हणजे भाजपने महाराष्ट्रामध्ये 20 जागांसाठी उमेदवारी दिली असून राज्यातील दिग्गज भाजप नेते नितीन गडकरी यांचं देखील नाव पहिल्या यादीत नव्हतं.

Arvind Kejriwal । सर्वात मोठी बातमी! दिल्लीत लागू होणार राष्ट्रपती राजवट?

Spread the love