Loksabha Elections 2024 । सातारच्या राजकारणात मोठी खळबळ! उदयनराजे भोसले नाराज, दिल्लीत ठोकला तळ

Loksabha Elections 2024 । सध्या लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून उमेदवारांच्या नावांची घोषणा होत आहे. आपल्याला संधी मिळावी असे प्रत्येक नेत्याला वाटत आहे. दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी उदयनराजे भोसले इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी उदयनराजे भोसले यांनी थेट दिल्ली गाठली आहे. उदयनराजे भोसले केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.

Ajit Pawar । सुप्रिया सुळेंबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट

Topers Ad

सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी उदयनराजे भोसले इच्छुक आहेत आणि त्यामुळेच ते दिल्ली या ठिकाणी दाखल झाले आहेत. या ठिकाणी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी काही दिवसापूर्वी जाहीर केली होती. मात्र या यादीमध्ये उदयनराजे यांचे नाव नव्हतं त्यामुळे सातारा लोकसभा उमेदवारीवरून संभ्रम कायम असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे.

Mumbai News । धक्कादायक बातमी! वडिलांचा पीएफ मागितल्यावर कंपनीच्या एचआरने मुलीकडे केली सेक्सची मागणी

भाजपने जाहीर केलेल्या २० जणांच्या उमेदवारी यादीत आपले नाव नसल्यामुळे उदयनराजे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. उदयनराजे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. त्यांच्याशी देखील याबाबत चर्चा झाली होती. मात्र चर्चेनंतरही सातारा लोकसभेच्या उमेदवारीबाबत कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळेच आता उदयनराजेंनी दिल्ली गाठली असून ते केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत.

Arvind Kejriwal । सर्वात मोठी बातमी! दिल्लीत लागू होणार राष्ट्रपती राजवट?

Spread the love