Eknath Shinde । शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी अखेर मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडण्याचे संकेत दिले आहेत. २३ नोव्हेंबर रोजी त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना तो सुपूर्द केला. यानंतर त्यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले की, त्यांना कोणतीही नाराजी नाही आहे आणि महायुतीचा निर्णय मान्य असेल.
एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, “आम्ही महायुतीचे लोक आहोत आणि महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे. वरिष्ठ नेत्यांनी जो निर्णय घेतला, तो आम्ही मान्य करतो.” तसेच, शिंदे यांनी देशाच्या विकासावर भाष्य करत, “आत्मनिर्भर भारताच्या ध्येयाने महाराष्ट्राला फायदा होईल” असे सांगितले. एकनाथ शिंदे यांनी मोदी आणि शाह यांना फोनवर सांगितले की, सरकार स्थापन करताना त्यांना कोणतीही अडचण आणू नका आणि जो निर्णय घेणारे, त्याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असावा.
Eknath Shinde । सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता
शिंदे यांनी आपले कार्यकर्ते आणि सामान्य शिवसैनिकांसाठी विशेष आभार व्यक्त करत, “मुख्यमंत्रीपद हे माझ्यासाठी एक मोठं मान आहे, आणि मला अजून खूप काम करायचं आहे,” असे म्हटले. त्याचबरोबर, महाराष्ट्रातील महायुती सरकार अधिक भक्कमपणे काम करणार असल्याची ग्वाही दिली.
Politics News । ब्रेकिंग! महारष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? सर्वात मोठी अपडेट समोर