Eknath Shinde । सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता

Eknath Shinde

Eknath Shinde । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय वातावरण तापले असून, एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्यामुळे शिंदे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात नवीन मुख्यमंत्री शपथ घेईपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहेत. एकनाथ शिंदे आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याने, राज्यभरात याबाबत उत्सुकता आहे.

Politics News । ब्रेकिंग! महारष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? सर्वात मोठी अपडेट समोर

तथापि, एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. महायुतीला निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले असून, मुख्यमंत्रिपद भाजपला देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असं सध्या बोललं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाबाबत निरोप मिळाल्याची चर्चा आहे. शिंदे यांचे म्हणणे आहे की, त्यांना किमान दीड वर्षे मुख्यमंत्रिपद दिलं जावं.

Ladki Bahin Yojna । महायुतीसरकार लाडक्या बहिणींना देणार 2,100 रुपये; डिसेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

महायुतीच्या प्रचंड विजयानंतर महाराष्ट्रात सरकार स्थापन होणार आहे. मात्र, मुख्यमंत्रिपदाबाबत अजून निर्णय झालेला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत येऊन या मुद्द्यावर मोठी घोषणा करू शकतात. यावर राज्याचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर, शिंदे यांनी सोशल मीडियावर एक ट्विट करून शिवसेना कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे टाळण्याचे आवाहन केले आहे.

Accident News । धक्कादायक, लग्नावरून परतताना बोलेरो कारचा भीषण अपघात; ५ जण जागीच ठार

Spread the love