Politics News । ब्रेकिंग! महारष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? सर्वात मोठी अपडेट समोर

Mahayuti

Politics News । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची नावे आघाडीवर आहेत. महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांना मिळून 234 जागा मिळाल्या असून, यामध्ये भाजपला 132 जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपच्या दिग्गज नेत्यांमध्ये फडणवीस यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या दाव्याला जोर आहे, तर शिंदे यांनी अजून कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.

Ladki Bahin Yojna । महायुतीसरकार लाडक्या बहिणींना देणार 2,100 रुपये; डिसेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय नेतृत्वाच्या गटाने फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव चर्चेत आणला आहे. यासाठी आरएसएसने देखील फडणवीस यांना ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे, फडणवीस यांच्या बाजूने राजकीय वर्तुळात हवा निर्माण झाली आहे. या संदर्भात महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या बैठकाही सुरू असून, आज रात्रीपर्यंत मुख्यमंत्रीपदाबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Accident News । धक्कादायक, लग्नावरून परतताना बोलेरो कारचा भीषण अपघात; ५ जण जागीच ठार

फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर, शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरून सोडून देण्याची भूमिका घेतल्यास, त्यांना राजकीय फायदाही होऊ शकतो. तथापि, महायुतीतील तिन्ही पक्षांच्या बैठकीनंतरच अंतिम निर्णय होईल. आगामी बैठकीत चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार हे स्पष्ट होईल.

Uddhav Thackeray । ब्रेकिंग! पराभवानंतर उद्धव ठाकरे यांचे सर्वात मोठे वक्तव्य, म्हणाले…

Spread the love