Narendr Modi । महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास आला. फोन करणाऱ्याने सांगितले की, मोदींना मारण्याचा कट रचला आहे आणि हत्याराची तयारी देखील पूर्ण केली आहे. या धमकीमुळे मुंबई पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला असून, एका महिलेला अटक देखील केली आहे.
प्राथमिक तपासानुसार, या महिलेने कौटुंबिक वादामुळे मानसिक तणावात असताना हा फोन केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस विभाग या प्रकरणी सखोल तपास करत असून, या धमकीच्या कॉलमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे.
Eknath Shinde । ब्रेकिंग! मुख्यमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदे यांनी केले सर्वात मोठे वक्तव्य
यापूर्वी देखील पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या, ज्यामध्ये कर्नाटकमधील मोहम्मद रसूल कद्दारेने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत धमकी दिली होती. तथापि, या नवीन धमकीच्या कॉलमुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे आणि तपास कार्यवाही सुरु आहे.
Politics News । ब्रेकिंग! महारष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? सर्वात मोठी अपडेट समोर