Satara Lok Sabha Election । साताऱ्याच्या राजकारणात मोठी खळबळ! उदयनराजेंचा पत्ता होणार कट?

Satara Lok Sabha Election

Satara Lok Sabha Election । सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. तर मागील काही दिवसांपासून साताऱ्यातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) उभे राहणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. असे असतानाच उदयनराजेंचा पत्ता कट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. (Latest marathi news)

Prakash Ambedkar । मोठी बातमी! प्रकाश आंबेडकर यांना सर्वात मोठा धक्का

सातारा लोकसभा मतदारसंघात आता पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध डॉ. सुरेश भोसले किंवा डॉ. अतुल भोसले किंवा नरेंद्र आण्णासाहेब पाटील यांच्यात लढत होणार असल्याच्या चर्चा आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर जनसामान्यात स्वच्छ प्रतिमा असणारा ताकदीचा उमेदवार महायुतीला किंवा भाजपला द्यावा लागेल. त्यामुळे आता भाजप (BJP) कोणता उमेदवार देणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Car Accident News । भीषण अपघात! शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीला पोलिसांच्या गाडीची जोरात धडक

दरम्यान, साताऱ्यात विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यामुळे सध्या पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत येत आहे. त्यामुळे भाजप आणि महायुतीला सातारा लोकसभेसाठी उमेदवारीची नव्याने मांडणी करावी लागणार आहे. त्याशिवाय उदयनराजे भोसले विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण अशी लढत देखील अतिशय चुरशीची होऊ शकते.

Ravindra Dhangekar । माझी पीएचडी… भाजपने शिक्षणावरून केलेल्या टीकेचा धंगेकरांनी घेतला खरपूस समाचार

Spread the love