Car Accident News । भीषण अपघात! शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीला पोलिसांच्या गाडीची जोरात धडक

Car Accident News

Car Accident News । जळगाव : सध्या अपघाताची एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगावच्या मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा भीषण (Car Accident) अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात चंद्रकांत पाटील हे किरकोळ जखमी झाले असून त्यांना अपघातानंतर तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. (Latest marathi news)

Ravindra Dhangekar । माझी पीएचडी… भाजपने शिक्षणावरून केलेल्या टीकेचा धंगेकरांनी घेतला खरपूस समाचार

याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या ताफ्यातील पोलीस गाडी धडकून हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात गाडीच्या बोनेटचं नुकसान झालं आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. चंद्रकांत पाटील हे अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. अपघाताच्या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

Nilesh Lanke । “वेळ आली की मी सर्व सांगणार…”, निलेश लंके यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

दरम्यान, राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. सर्व पक्ष निवडणुकीची तयारी करताना दिसत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर नेतेमंडळी आपापल्या मतदारसंघात सभा घेताना दिसत आहेत. पण या धावपळीच्या काळात या नेत्यांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच मागील आठवड्यात देखील केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांच्या गाडीचा अपघात झाला होता. या अपघातात ते थोडक्यात बचावले होते.

Politics News । कोल्हापूरमध्ये मोठी खळबळ! सोशल मीडियावर शाहू छत्रपतींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट

Spread the love