Nilesh Lanke । मागील काही दिवसांपासून निलेश लंके हे चर्चेचा विषय बनत आहेत. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने (Nationalist Sharad Chandra Pawar group) निलेश लंके यांना अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून (Ahmednagar South Lok Sabha Constituency) उमेदवारी दिली आहे. अशातच आता निलेश लंके यांनी एक विधान केले आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Latest marathi news)
Politics News । कोल्हापूरमध्ये मोठी खळबळ! सोशल मीडियावर शाहू छत्रपतींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट
निलेश लंके यांनी स्वाभिमानी जनसंवाद यात्रा काढली असून यावेळी ते बोलताना म्हणाले की,”राजकारण ही विचारांची लढाई असून ती विचारांनीच लढावी. जर एखादा कार्यकर्ता विरोधात गेला की त्याची चौकशी लावून त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातात. सध्या असले प्रकार वाढले असून सर्वसामान्य माणूस पुढे आले की त्याला दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण मी जनतेच्या पाठिंब्याने मी खासदार होणारच, असा विश्वास निलेश लंके यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
“आपल्याकडे काही सीनियर लोक आहेत. चुकीच्या पद्धतीने त्यांनी काम केलं आहे. हे संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. मी वेळ आली की, सर्व काही सांगेल. मी जास्तीत जास्त गावात जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेणार आहे. आता हा रथ दिल्लीलाच जाऊनच थांबणार आहे. अनेक जण पाच वर्ष फिरत नाही तर साखर-गुळ वाटायला येतात. तुम्हाला कुणीही संसदमध्ये नेलं नाही. पण मी तुम्हाला सर्वांना घेऊन जाईल,” असेही आश्वासन निलेश लंके यांनी दिले आहे.