
Dhananjay Munde । बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे धक्कादायक फोटो समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे चांगलाच राजकीय वाद निर्माण झाला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला होता.
Devendra Fadnavis । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, “महाराष्ट्रात 15 एप्रिलपर्यंत..”
आज, विधीमंडळाच्या कामकाजाच्या सुरुवातीस, धनंजय मुंडे यांनी स्वतः न येता, आपल्या पीए प्रशांत जोशीद्वारे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला. यापूर्वी, मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका बैठकीत मुंडे यांना थेट राजीनामा देण्यास सांगितले होते. बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आणि प्रफुल पटेल उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. मुंडे यांची निवडणूक व्यवस्थापकीय कारभार करणाऱ्या कराडवर अनेक आरोप आहेत. विरोधकांच्या आरोपानुसार, कराडने बीडमध्ये आपली राजकीय छावणी निर्माण केली होती आणि अनेक गुन्हे पचवले होते. या प्रकरणात, कराड आरोपी असल्यामुळे तपास योग्य पद्धतीने होणार नाही, अशी शंका विरोधकांनी व्यक्त केली होती, आणि त्यामुळेच मुंडे यांचा राजीनामा मागितला जात होता.