
Santosh Deshmukh । संतोष देशमुख यांच्या हत्येचे धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारे फोटो आता समोर आले आहेत. या फोटोच्या पाहणीने देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले आहेत. धनंजय देशमुख यांनी सांगितले की, “मी पहिला फोटो पाहिला आणि माझे डोळे बंद केलं. इतका क्रूरपणा आणि हत्या करणाऱ्यांनी याचे समर्थन करणारे लोक म्हणजे हारामखोर आहेत,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
संतोष देशमुख यांच्या हत्येची माहिती आधीच समोर आलेली होती, पण त्यांच्या हत्येच्या वेळचे फोटो पाहिल्यानंतर मात्र क्रूरतेचा आणखी मोठा अंदाज येतो. यात, संतोष देशमुख यांचा चेहरा सुजलेला असून, ते जमिनीवर गतप्राण अवस्थेत पडले आहेत. हत्या करत असताना आरोपी हसत होते आणि व्हिडीओ काढताना देखील त्यांचे हास्य दिसते. काही आरोपींनी मानेवर पाय ठेवल्याचे, तर काहींनी अत्यंत क्रूरपणे त्यांना मारले आहे.
Devendra Fadnavis । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, “महाराष्ट्रात 15 एप्रिलपर्यंत..”
सीआयडीने यासंदर्भात चार्जशिट दाखल केले आहे, ज्यामध्ये या हत्येच्या वेळचे फोटो आणि व्हिडीओचा समावेश आहे. आरोपींच्या नावांचा उल्लेख चार्जशिटमध्ये करण्यात आला आहे, ज्यात प्रमुख आरोपी म्हणून वाल्मीक कराड, विष्णू चाटे, आणि इतरांचा समावेश आहे. या गंभीर हत्येच्या प्रकरणात, पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबावरून कराडविरुद्ध सबळ पुरावे सापडले आहेत.