Dhananjaya Mahadik । धनंजय महाडिक यांनी लावली 5 कोटी रुपयांची शर्यत, नेमकं कारण काय?

Dhananjaya Mahadik

Dhananjaya Mahadik । कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तोंडावर सर्व राजकीय पक्ष आणि राजकीय नेते तयारीला लागले आहेत. निवडून येण्यासाठी राजकीय पक्ष साम, दाम, दंड, भेद असे सूत्र वापरत आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात (Kolhapur Lok Sabha Constituency) महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

Sayaji Shinde । ब्रेकिंग! अभिनेते सयाजी शिंदे रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी केली शस्त्रक्रिया

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात संजय मंडलिक विरुद्ध शाहू महाराज छत्रपती (Sanjay Mandalik Vs Shahu Maharaj Chhatrapati) यांच्यात लढत पार पडणार आहे. अटीतटीच्या सामन्यात कोणाचा विजय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना निवडून देण्यासाठी कागल आणि चंदगड या दोन्ही तालुक्यात स्पर्धा लावली आहे. संजय मंडलिक निवडून आल्यानंतर ज्या तालुक्यातून जास्त लीड पडेल त्या तालुक्याला धनंजय महाडिक (Dhananjaya Mahadik) आणि संजय मंडलिक यांच्या निधीतील अडीच अडीच कोटी रुपयांचा अधिकचा निधी देण्याची शर्यत लावली आहे.

Uddhav Thackeray । उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का, बडा नेता नॉटरीचेबल; शिंदे गटात करणार प्रवेश?

सध्या सोशल मीडियावर या प्रचार सभेतील घोषणेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मतदार संघात आपली चांगली परिस्थिती असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील देखील आपल्यासोबत आहेत. भाजपची मोठी ताकद तालुक्यात आहे. तुम्ही सर्वांनी ठरवले तर काँग्रेसचे बुथ लागणार की नाही, याची मला शंका आहे, असेही धनंजय महाडिक म्हणाले आहेत.

Politics News । राजकारणातून समोर आली सर्वात मोठी बातमी, शरद पवारांनी दिला भाजपला धक्का

Spread the love