Car Accident । अपघाताचे प्रमाण अजूनही कमी झाले नाही. अनेक भीषण अपघात घडल्याचे आपण पाहत असतो. यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. अपघातामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होतात. काहीजण जाणूनबुजून वाहतुकीचे नियम मोडतात आणि अपघात होतो. देशात सध्या सणासुदीचा हंगाम सुरु आहे. सर्वत्र जल्लोष सुरु आहे. मात्र यामध्येच आता अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
सध्या झारखंडमधून अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. झारखंडच्या गिरिडीहमध्ये भीषण रस्ता अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (A shocking news of accident from Jharkhand)
या अपघातामधील जखमी लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. एका लग्न समारंभाला उपस्थित राहून परतत असताना हा भीषण अपघात झाला आहे. यामुळे तेथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.