Maharashtra Politics । राज्याच्या राजकारणामध्ये सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे राज्यात मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रावरून राज्याचे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्याचबरोबर आता दुसरीकडे राजकारणातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्र प्रकरणावर आजपासून सुनावणीला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. (MLA disqualified)
आज दुपारी १२ वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी ठाकरे गटाने मोठी रणनीती आखली असल्याची देखील माहिती समोर आली आहे. आज होणाऱ्या सुनावणीला कसं सामोरे जायच याबाबत ठाकरे गटाकडून नियोजन देखील करण्यात आल आहे. या सुनावणीला सुरुवात होण्याआधी ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक देखील मुंबईमध्ये बोलवण्यात आली आहे. विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुंबईतील कार्यालयात ही बैठक होणार आहे.
Anil Parab । “…त्यामुळे भाजपने राष्ट्रवादी फोडली”, अनिल परब यांच्या दाव्याने खळबळ
जर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांना आपलं म्हणण मांडण्यास सांगितलं तरच ठाकरे गटाचे आमदार स्वतः आपली भूमिका मांडतील. त्यामुळे आता या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे की ठाकरे कोणाचे आमदार अपात्र ठरणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.